Back to Blog

खताचे ऑनलाईन बुकिंग कसे करावे? FFS अ‍ॅप वापरण्याची संपूर्ण माहिती

KrushiSarthi Team
August 24, 2026
4 min read
खताचे ऑनलाईन बुकिंग कसे करावे? FFS अ‍ॅप वापरण्याची संपूर्ण माहिती

FFS (Framework for Fertilizer Sale) अ‍ॅप काय आहे?

जय शिवराय शेतकरी मित्रांनो! दरवर्षी खरीप हंगामात खतासाठी (विशेषतः युरिया आणि DAP) मोठी रांग लावावी लागते, आणि अनेकदा वेळेवर खत मिळत नाही. याच समस्येवर तोडगा म्हणून कृषी विभागाने "Framework for Fertilizer Sale (FFS)" हे नवीन मोबाईल अ‍ॅप आणले आहे.

या अ‍ॅपच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने खताचे बुकिंग करता येणार आहे. तुमची जमीन आणि पीक यानुसार तुम्हाला किती खत मिळेल हे हे अ‍ॅप ठरवते. आता ही सुविधा संपूर्ण महाराष्ट्रात लागू करण्यात आली असून, सर्व जिल्ह्यातील शेतकरी याचा लाभ घेऊ शकतात.

FFS अ‍ॅपचे मुख्य फायदे

  • रांगेत उभे राहण्याची गरज नाही: मोबाईलवरून बुकिंग करा आणि थेट दुकानातून खत घ्या.
  • योग्य वाटप: सातबारा आणि पिकाच्या नोंदीनुसार योग्य प्रमाणात खत मिळणार, ज्यामुळे काळाबाजार थांबेल.
  • खंडाने/बटईने करणाऱ्यांसाठी सोय: ज्यांच्या नावावर जमीन नाही (जे बटईने शेती करतात) त्यांनाही या अ‍ॅपमधून खत बुक करता येणार आहे.

मोबाईलवरून खत कसे बुक करावे? (स्टेप-बाय-स्टेप माहिती)

स्टेप 1: अ‍ॅप डाऊनलोड आणि लॉगिन

Framework for Fertilizer Sale App Aadhaar and Farmer ID Verification Process

  1. सर्वात आधी तुमच्या मोबाईलच्या Google Play Store वर जाऊन "Framework for Fertilizer Sale" सर्च करा आणि अ‍ॅप इन्स्टॉल करा. अ‍ॅप थेट डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
  2. अ‍ॅप ओपन करून State मध्ये Maharashtra (महाराष्ट्र) निवडा.
  3. तुम्ही आधार नंबर किंवा फार्मर आयडी (Farmer ID) वापरून लॉगिन करू शकता.
  4. जर तुमच्याकडे फार्मर आयडी नसेल, तर आधार नंबर टाका. तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल, तो टाकून Verify करा.

स्टेप 2: जमिनीची माहिती (सातबारा) जोडणे

खत बुक करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या जमिनीचा तपशील अ‍ॅपमध्ये टाकावा लागेल.

  1. होम पेजवरील "Add New Land" (प्लस + बटन) वर क्लिक करा.
  2. जमीन स्वतःची असल्यास "I am an Owner" निवडा. खंडने/बटईने करत असल्यास दुसरा पर्याय निवडा.
  3. तुमचा जिल्हा, तालुका, आणि गाव निवडा.
  4. तुमचा गट नंबर (Survey Number/Gata Number) टाकून Fetch वर क्लिक करा.
  5. सरकारी रेकॉर्डनुसार तुमचे नाव आणि जमिनीचे क्षेत्र दिसेल. माहिती तपासून Save करा.

स्टेप 3: पीक निवडणे (Crop Selection)

तुम्ही कोणते पीक घेणार आहात यावर खताची मात्रा अवलंबून असते.

FFS App Crop Selection and Fertilizer Requirement Mapping

  1. जोडलेल्या जमिनीवर जाऊन "Select Crop" वर क्लिक करा.
  2. पिकाची कॅटेगरी (उदा. Oil Seed) आणि पीक (उदा. सोयाबीन, भुईमूग किंवा कापूस) निवडा.
  3. पीक निवडल्यानंतर "Apply for Fertilizer" वर क्लिक करा.

स्टेप 4: खत निवडणे आणि कृषी सेवा केंद्र (Dealer) निवडणे

तुमच्या क्षेत्रानुसार तुम्हाला किती खत (उदा. ४ बॅग युरिया, २ बॅग DAP, ६ बॅग SSP) मिळेल हे अ‍ॅपमध्ये दिसेल.

Selecting a Local Krushi Seva Kendra Fertilizer Dealer on FFS App

  1. Yes, Proceed वर क्लिक करा.
  2. तुम्हाला नको असलेल्या खताच्या बॅग्स (-) बटन दाबून कमी करा किंवा Delete करा.
  3. जे खत हवे आहे ते निवडून Next वर क्लिक करा.
  4. आता तुमच्या आजूबाजूच्या (उदा. तुमच्या तालुक्यातील) अधिकृत खत विक्रेत्यांची (Dealers) यादी दिसेल.
  5. तुम्हाला ज्या कृषी सेवा केंद्रातून खत घ्यायचे आहे ते निवडा.

स्टेप 5: QR कोड आणि खताची डिलिव्हरी

बुकिंग पूर्ण झाल्यावर अ‍ॅपमध्ये एक QR Code तयार होईल.

Scanning FFS App QR Code for Urea and DAP Fertilizer Pickup

  1. या QR कोडचा स्क्रीनशॉट काढून घ्या.
  2. बुकिंग केल्यापासून ३ दिवसांच्या आत तुम्ही निवडलेल्या कृषी सेवा केंद्रात (दुकानदाराकडे) जा.
  3. तिथे हा QR कोड दाखवा. दुकानदार तो स्कॅन करून तुम्हाला तुमचे खत देईल.

जर तुम्हाला काही कारणास्तव खत नको असेल, तर अ‍ॅपच्या History मध्ये जाऊन तुम्ही बुकिंग रद्द (Cancel) देखील करू शकता.


खत विक्रेत्यांसाठी (Agri Input Dealers) महत्त्वाची माहिती

तुम्ही जर कृषी सेवा केंद्र चालवत असाल, तर हे नवीन QR कोड सिस्टीम आल्यावर तुम्हालाही डिजिटल व्हावे लागेल. रोजचे बिलिंग, मालाचा स्टॉक, आणि शेतकऱ्यांची उधारी सांभाळणे सोपे करण्यासाठी KrushiSarthi (कृषि सारथी) हे महाराष्ट्रातील नंबर १ बिलिंग सॉफ्टवेअर आहे.

KrushiSarthi वापरून तुम्ही खत, बी-बियाणे आणि कीटकनाशकांचे सर्व रेकॉर्ड अतिशय सोप्या पद्धतीने मोबाईल आणि कम्प्युटरवर ठेऊ शकता.

कृषि सारथी सॉफ्टवेअरबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आणि तुमची दुकान स्मार्ट बनवण्यासाठी इथे क्लिक करा.

#guide#fertilizer#ffs-app#maharashtra#marathi